esakal | पुणे-बंगळूर मार्गावर कारच्या धडकेत साताऱ्याचे तीन जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Car Accident

साताऱ्यातून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कराड दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कारने मागून जोरदार धडक दिली.

पुणे-बंगळूर मार्गावर कारच्या धडकेत साताऱ्याचे तीन जखमी

sakal_logo
By
राजेंद्र ननावरेे

मलकापूर (सातारा) : साताऱ्यातून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कराड दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला (Tractor Trolley) पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालकासह तिघे जखमी झाले आहेत. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर (Pune-Bangalore Highway) गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत बुधवारी सकाळी हा अपघात घडला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. योगेश अशोक बारटक्के (वय ३५), भारती अशोक बारटक्के (वय ५५ ), निरज योगेश बारटक्के (वय ५, सर्व रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. (Three People Injured In Pune-Bangalore Highway Car Tractor Trolley Accident bam92)

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती, अशी ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ११ यू ०८२३ ) हा ट्रॉली क्रमांक (एमएच ११ आर ९६५३ व ९६५४) घेऊन कराडकडे जात होता. बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत आले असता, सातारा येथून कोल्हापूर दिशेने जात असलेल्या कार (क्रमांक एमएच १२ ईटी ३४३७) च्या चालकाचा ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटल्याने कारची ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक झाली. या अपघातात चालकासह कारमधील बारटक्के कुटुंबातील तिघे जखमी झाले.

हेही वाचा: ठरलं! ZP साठी काँग्रेसचा 'टाॅप प्लॅन'

Car-Tractor Trolley Accident

Car-Tractor Trolley Accident

अपघाताची माहिती मिळताच, महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, रमेश खुणे, सिकंदर उघडे, यांच्यासह महामार्ग पोलीस कर्मचारी व कराड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रशांत जाधव खलिल इनामदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ उपमार्गावरून वळवण्यात आली होती. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. जखमीला रूग्णालयात पाठवल्यानंतर महामार्ग देखभालीचे व महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.

Three People Injured In Pune-Bangalore Highway Car Tractor Trolley Accident bam92

loading image