esakal | धक्कादायक! बेड न मिळाल्याने तळबीडात तीन महिलांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Coronavirus

धक्कादायक! बेड न मिळाल्याने तळबीडात तीन महिलांचा मृत्यू

sakal_logo
By
तानाजी पवार

वहागाव (सातारा) : तळबीड (ता. कऱ्हाड) येथे कोरोना संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच काल एकाच दिवशी तीन वृद्ध महिलांना बेड उपलब्ध झाला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे.

तळबीडमध्ये 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यापैकी सध्या 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाच जणांवर हॉस्पिटलला उपचार सुरू असून, 14 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आज तेथील पेठ विभागातील दोन व चव्हाण वस्ती परिसरातील एक अशा एकूण तीन वृद्ध महिलांना बेड उपलब्ध झाला नसल्याने व योग्य ते उपचार मिळाला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू होती.

कोरोनाला रोखण्यासाठी वाईत 'कोविड टास्क फोर्स'; रुग्णांसह कुटुंबीयांना करणार मदत

त्यांच्यावर कऱ्हाड पालिकेच्या वतीने कऱ्हाडच्या कोरोना रुग्णांसाठीच्या तयार केलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेने तळबीड परिसर हादरला आहे. आज (शनिवार) संपूर्ण गाव लॉक करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. महिलांना बेड मिळावा, यासाठी संशयितांच्या नातेवाइकांनी, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या हेल्पलाइनवर, शासकीय, खासगी रुग्णालयात संपर्क साधला. मात्र त्यांना बेड मिळाला नाही. त्यामुळे तीन महिलांना जीव गमवावा लागल्याने त्यांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.

Edited By : Balkrishna Madhale