कऱ्हाडच्या बाराडबरे परिसरात धारदार शस्त्राने मुलाचा खून

कऱ्हाडच्या बाराडबरे परिसरात धारदार शस्त्राने मुलाचा खून
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) ः अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना साेमवारी (ता.14) दुपारी पावणेचारच्या सुमारास येथील बाराडबरे परिसरात घडली. आदित्य गौतम बनसोडे (वय 16, रा. बाराडबरे परिसर, कऱ्हाड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनेनंतर संशयित पसार झाले आहेत. यामध्ये तीन संशयित असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
 
घटनास्थळावरून मिळालेली व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आदित्य बनसोडे हा बाराडबरे परिसरात राहतो. बाराडबरे परिसरातील एका किराणा दुकानासमोर साेमवारी दुपारी संशयिताकडून आदित्यवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्या वेळी आदित्यने आरडाओरडा केल्याने इतरांना त्याची माहिती झाली. दरम्यान, त्याच्या पोटावर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो खाली पडला. त्याच वेळी हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. हा प्रकार पाहून परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्यच्या कुटुंबीयांनी तेथील उपस्थितांच्या मदतीने त्याला उपचारासाठी तत्काळ येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवले. त्याला गंभीर मार लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कृष्णा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.

चेला कारखान्याचा चेअरमन असल्याने हिंदकेसरी खंचनाळे अजिंक्यता-यावर नेहमी यायचे 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशी सुरू केली. आदित्याचे वडील गौतम बनसोडे यांनी शहर पोलिसात माहिती दिली. दरम्यान, आदित्यचा सायंकाळी मृत्यू झाल्याचे कृष्णा हॉस्पिटलमधील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेमध्ये तीन संशयित असावेत, असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.

माझेरी जिल्हा परिषद शाळेचे 19 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

आदित्यचा खून नेमका कशासाठी आणि कोणत्या कारणावरून झाला हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेने शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com