esakal | अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाइन पद्धतीचा सातारा जिल्ह्यात प्रथमच प्रयाेग
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाइन पद्धतीचा सातारा जिल्ह्यात प्रथमच प्रयाेग

सातारा जिल्ह्यात अनुदानित प्रकारात कला शाखेसाठी 15460, वाणिज्य 7080, विज्ञान 11200, संयुक्त 3000 तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 800 जागा आहेत. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित प्रकारात कला शाखेसाठी 3360, वाणिज्य 1120, विज्ञान 3840, संयुक्त 240 तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 400 जागा आहेत. याबराेबरच स्वयंअर्थसायित्ता प्रकारात कला शाखेसाठी 240, वाणिज्य 880, विज्ञान 3040, संयुक्त 400 जागा आहेत.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाइन पद्धतीचा सातारा जिल्ह्यात प्रथमच प्रयाेग

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रियेस सातारा जिल्ह्यात 14 ऑगस्टपासून प्रारंभ होत असून पालक आणि विद्यार्थ्यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. काेराेनाच्या पार्श्वभुमीवर यंदाची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असेल. जेथे आॅनलाईन पद्धतीने करणे शक्य नाही तेथेच आॅफलाईन पद्धतीने प्रक्रिया हाेईल असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी बनले कठाेर, अखेर 'हा" निर्णय घेतलाच

यंदा सातारा जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या परिक्षेत 41 हजार 018 विद्यार्थी पास झाले आहेत. सातारा जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी 51 हजार 060 इतक्या जागा आहेत. अकरावी प्रवेशासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळ, लिंक याची व्यवस्था करावी. जेथे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणे शक्‍य होणार नाही तेथे सोशल डिस्टन्सिंग सांभाळून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत, अशीही सूचना केल्याचे क्षीरसागर यांनी नमूद केले.

ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं सौभाग्याचं लेणं..!  

इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 14 ते 19 ऑगस्ट या कालावधीत अर्ज घेणे व देणे ही प्रक्रिया करावी. त्यानंतर 20 ते 24 ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांनी प्रवेश अर्जाची छाननी, तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करावी. प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी  25 ऑगस्टला दुपारी तीन वाजता जाहीर करावी.  प्रवेशाची निवड यादी व प्रतीक्षा यादी कनिष्ठ महाविद्यालयांनी सूचना फलकांवर लावावी अशी सूचना करण्यात आली आहे. 

 कास धरणावरील हा Video पाहून काळजात धस्स झाल

त्यानंतर 26, 28, 29 आणि 31 या काालवधीत गुणवत्तेनूसार निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्राच्या आधारे दोन व तीन सप्टेंबर रोजी प्रवेश द्यावा. चार व पाच सप्टेंबर रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना सात व आठ सप्टेंबरला प्रवेश द्यावा असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.  

आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती

सातारा जिल्ह्यात अनुदानित प्रकारात कला शाखेसाठी 15460, वाणिज्य 7080, विज्ञान 11200, संयुक्त 3000 तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 800 जागा आहेत. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित प्रकारात कला शाखेसाठी 3360, वाणिज्य 1120, विज्ञान 3840, संयुक्त 240 तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 400 जागा आहेत. याबराेबरच स्वयंअर्थसायित्ता प्रकारात कला शाखेसाठी 240, वाणिज्य 880, विज्ञान 3040, संयुक्त 400 जागा आहेत.

कोरोना इफेक्ट : सातारा जिल्ह्यात यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन

Edited By : Siddharth Latkar 

loading image
go to top