पुढच्या ऑलिम्पिकमध्ये Gold Medal फिक्स; तिरंदाज प्रवीणची ग्वाही

प्रवीण जाधवचा क्रीडामंत्री सुनील केदारांकडून सत्कार
Pravin Jadhav
Pravin Jadhavesakal

फलटण (सातारा) : राज्यातील खेळाडूंनी खेळावरच लक्षकेंद्रीत करणे गरजेचे आहे. राज्य शासन सर्व खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून राज्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ (Sports University) सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार (sports minister sunil kedar) यांनी दिली. सरडे (ता. फलटण) येथे तिरंदाज प्रवीण जाधव (Archer Pravin Jadhav) याच्या घरी क्रीडामंत्री केदार यांनी भेट देऊन प्रवीण जाधव यांचा सन्मान व सत्कार केला, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण (MLA Deepak Chavan), प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, क्रीडाधिकारी युवराज नाईक, महेंद्र सूर्यवंशी-बेडके, महेश खुंटाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Summary

फलटणमधील सरडेसारख्या छोट्याशा गावामधून प्रवीण जाधव यांनी स्वतःची कला, कौशल्य ओळखून क्रीडा प्रबोधिनीमध्ये जाऊन तिरंदाजीचे शिक्षण घेतले.

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामधील सरडेसारख्या छोट्याशा गावामधून प्रवीण जाधव यांनी स्वतःची कला, कौशल्य ओळखून क्रीडा प्रबोधिनीमध्ये जाऊन तिरंदाजीचे शिक्षण घेतले. तालुका व राज्याचे नाव उंचावेल, अशी टोकियोतील ऑलम्पिकमध्ये (tokyo olympics 2020) कामगिरी बजावली. या वेळेस नाही, परंतु पुढच्या वेळेस प्रवीण हा देश व राज्यासाठी नक्कीच गोल्ड मेडल जिंकेल, असा विश्वासही क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केला. क्रीडामंत्री म्हणून काम करत असताना या विभागाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा आहे. राज्यांमध्ये विविध खेळांत खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. खेळाडू म्हणून खेळत असताना प्रत्येकजण उतरल्यानंतर प्रत्येकालाच मेडल मिळेलच, असंही नाही. परंतु, खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावून खेळले पाहिजे. खेळाडूंसाठी पुण्यातील बालेवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

Pravin Jadhav
'थ्रो थाळीफेक'मध्ये 'माणदेशी'च्या आदिती बुगडला सुवर्ण

प्रवीणप्रमाणेच आणखी खेळाडू फलटण तालुक्यामधून तयार व्हावेत, यासाठी फलटणात भव्य क्रीडा संकुल उभारण्याबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कार्यरत आहोत, तरी फलटण येथे क्रीडा संकुल उभे राहण्यासाठी क्रीडा संचालनालयाच्या माध्यमातून आपण जास्तीत-जास्त निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार दीपक चव्हाण यांनी केली. यावर्षी टोकियोत झालेल्या ऑलंपिकमध्ये खेळताना मी आपल्या देशासाठी व राज्यासाठी पदक आणू शकलो नाही. परंतु, आगामी होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये मी नक्कीच पदक आणि त्यासाठीच मी कार्यरत राहीन, अशी ग्वाही तिरंदाज प्रवीण जाधव यांनी दिली. यावेळी फलटण तालुक्यामधील गुणवंत खेळाडूंचा क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com