कास : फुले नव्हे, वन्यप्राण्यांना पाहून सातारकरांना हाेताेय आनंद

सिद्धार्थ लाटकर
Monday, 19 October 2020

कास परिसरात फिरायला जाणारे सातारकर नागरिक हे वन्यप्राणी पाहून आनंदित होत आहेत.

सातारा :  काेराेनाच्या पार्श्वभुमीवर यंदा कास पुष्प पठारावरी फुलांचा गालिछा पर्यटकांना पाहता आला नाही. परंतु पर्यटकांना वन्यप्राण्यांचा आवर्जून दर्शन हाेत आहे. यामुळे कास परिसरात फिरायला जाणा-या पर्यटकांसह सातारकर नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. वन्यप्राण्यांमध्ये रानगव्याचे दर्शन सातत्याने हाेत आहे. याबराेबरच ससा, भेकर हे प्राणी देखील पाहण्यास मिळत आहे.

जागतिक वारसास्थळ असणार्‍या कास पुष्प पठाराचा यंदाचा हंगाम बंद ठेवण्यात आला आहे. कास पठारावर गर्दी नसल्याने पठार सुनेसुने झाले आहे. पर्यटक नसल्याने पठार निर्मनुष्य असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. यामुळेच  या भागात वन्यप्राणी फिरण्यास येत असल्याचे दिसत आहे.

हे प्राणी कधी कास पुष्प पठारावर तर कधी कास घाटाई फाटा पारंबे फाटा रस्त्यावर आढळतात. यामध्ये रानगवे, भेकर व इतर वन्यप्राणी येणार्‍या जाणार्‍यांचा समावेश असल्याचे येथून ये-जा करणारे वाहनचालक दिसत आहेत. 

दाेन दिवसांपुर्वी कास पठार परिसरात पर्यटकांना रानगव्याचे दर्शन झाले. फुले जरी पाहता येत नसली तरी वन्यप्राणी आवर्जून दर्शन देत असल्याने कास परिसरात फिरायला जाणारे सातारकर नागरिकांना आनंद होत आहे.

आम्ही व्यायाम करण्यासाठी यवतेश्वर, कास पठार, कास तलाव या भागात जात असताे. या भागात ब-याच दिवसांपासून छाेटे माेठे प्राणी दिसत आहेत. त्यांचा काेणाला त्रास नसताे. ससे अनेकदा गाडीच्या बाजूस दिसतात. रानगवे हे सहसा दिसत नाहीत परंतु या भागात त्यांचा वावर आहे असे विसावा नाका येथील प्रतापसिंह (सुनील) राजेभाेसले यांनी सांगितले.

Video : नांदगणेतील आजी जपताहेत लोकसंस्कृतीचा ठेवा

दुष्काळग्रस्त भागातील नेर तलाव खुणावतोय पर्यटकांना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourisits Enjoy Watching Animals At Kass Satara News