
सातारा जिल्ह्यातील मुख्य पर्यटनस्थळांच्या परिसरातील झोनचा असलेला प्रश्न सोडवणे आदी बाबींवर सखोल चर्चा झाली.
कास (जि. सातारा) : कास, वजराई, तसेच ठोसेघर धबधबा परिसरातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व आसपासच्या गावांतील जनतेला रोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीनंतर प्रत्यक्ष भेट देऊन या विभागातील विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागातील शिष्टमंडळास दिले.
माजी आमदार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दगडूदादा सकपाळ यांच्यासह स्थानिक लोकांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी झालेल्या चर्चेचा तपशील सांगताना श्री. सपकाळ म्हणाले, ""जिल्हा विविध निसर्गसंपदांनी समृद्ध असून, पर्यटनाच्या दृष्टीने म्हणावा तसा विकास झाला नाही. जिल्ह्यातील फुलांसाठी प्रसिद्ध जागतिक दर्जाचे कास पठार, आशिया खंडातील उंच भांबवली वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा व परिसरातील विविध पर्यटन स्थळांच्या व आसपासच्या गावांच्या विकासकामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.''
सैनिकांनाे! दीपावलीनिमित्त मिलिटरी कॅंटीन सुरु राहणार
या पर्यटन स्थळांना जाणारे विविध रस्ते दर्जेदार करणे, जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा देणे, सुरक्षात्मक उपाय म्हणून पोलिस चौक्या बांधणे व स्थानिक नागरिकांना रोजगार व विकासाची संधी उपलब्ध करून देणे, बामणोली- तापोळा येथील बोटिंग व्यवसाय वाढीसाठी उपाययोजना करणे, या गावातील शेतीमाल, कलाकुसर यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हॉटेल व्यवसायाला चालना देणे, या परिसरातील झोनचा असलेला प्रश्न सोडवणे आदी बाबींवर सखोल चर्चा झाली.
खटावची मान प्राजक्ताने दिल्ली तख्तावर उंचावली
या प्रसंगी कऱ्हाड उत्तरचे संपर्कप्रमुख शंकर सकपाळ, रवींद्र मोरे, कोंडीबा शिंदे, जितेंद्र सकपाळ, नंदकुमार गोरे, प्रदीप कदम, लक्ष्मण आखाडे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जगन्नाथ माने, नामदेव मोरे आदी उपस्थित होते.
आज दुपारी शिवसेनेचे ज्येष्ठ दगडू दादा सकपाळ जी यांनी माझी भेट घेऊन साताऱ्यात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा केली. pic.twitter.com/JBQwpmjuA5
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 30, 2020
Edited By : Siddharth Latkar