Satara News : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजल्या जाणाऱ्या तापोळ्यात पर्यटकांना मारहाणीचे प्रकार

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजल्या जाणाऱ्या तापोळा या पर्यटनस्थळावर आलेल्या पर्यटकांना दमदाटी आणि धतिंगशाही, मारहाण केली जात आहे.
beating case  in tapola
beating case in tapolasakal

भोसे : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजल्या जाणाऱ्या तापोळा या पर्यटनस्थळावर आलेल्या पर्यटकांना दमदाटी आणि धतिंगशाही, मारहाण केली जात आहे. याबाबत पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत असून, यामुळे पर्यटनस्थळाच्या नावलौकिकाला बट्टा लागून पर्यटनाला याचा फटका बसू शकतो, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्यामुळे स्थानिक, व्यावसायिक व पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. तापोळा येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना याचा नुकताच अनुभव आला आहे. दोन अज्ञात इसमांनी शिवीगाळ करून मारहाण केली असल्याची घटना घडल्याने या परिसरात संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापूर येथील पर्यटक राम खंडवाणी हे आपल्या कुटुंबीयांसह स्वतःच्या गाडीतून महाबळेश्वर पर्यटनासाठी आले होते. महाबळेश्वर-तापोळा रस्त्याचे काम चालू असल्याने हे कुटुंबीय कोट्रोशीमार्गे येत होते.

अचानक एका अनोळखी युवकाने त्यांची गाडी अडवली व शिवीगाळ करू लागला. त्यानंतर दहा किलोमीटर पुढे आल्यावर दुसऱ्या अनोळखी युवकाने त्यांची गाडी अडवली आणि नंतर पहिला इसम तेथे आला. त्याठिकाणी गाडीत असलेले हरी रोचलानी गाडीतून खाली उतरले असता या दोन युवकांनी त्यांना थेट मारायला सुरुवात केली.

पोलिस शोध घेणार का?

या घटनेतील दमदाटी व मारहाण करणाऱ्या युवकांच्या दोन गाड्यांपैकी एक गाडी विना नंबरप्लेट होती, तर दुसऱ्या गाडीचा नंबर पोलिसांना देण्यात आला आहे. त्यामुळे या गाडीचा पोलिस शोध घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

निंदणीय घटना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या विभागाचे जागतिक दर्जाचे नंदनवन करू पाहत असताना अशा घटना घडणे, हे निंदणीय आहे. त्यामुळे पोलिसांनी यामध्ये लक्ष घालणे आवश्‍यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com