esakal | हिरवा निसर्ग हा भवतीने.. महाबळेश्वरसह पाचगणीत निसर्ग खुलला
sakal

बोलून बातमी शोधा

Panchgani

गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. एप्रिल आला, मे महिन्यातील उन्हाळी हंगाम संपला.

हिरवा निसर्ग हा भवतीने.. महाबळेश्वरसह पाचगणीत निसर्ग खुलला

sakal_logo
By
सुनील कांबळे

पाचगणी : पर्यटकांना (Tourists) कोरोनाने (Coronavirus) जरी जखडून ठेवले असले, तरी निसर्ग आपलं रुपडं बदलण्यास थांबला नाही. पर्यटकांविना सुन्न झालेल्या निसर्गाची मुक्त हस्ते उधळण होत असलेल्या या ठिकाणी ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझीच वाट पाहात आहे,’ असा निसर्गाच्या (Nature) सुराचा भास होत आहे. लॉकडाउनमुळे (Lockdown) येथील जनजीवन आर्थिकदृष्ट्या गोठून टाकले आहे. (Tourist Places In Panchgani Are Waiting For Tourists Satara Marathi News)

गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. एप्रिल आला, मे महिन्यातील उन्हाळी हंगाम संपला. पर्यटन हंगाम (Tourist season) बारगळला. पर्यटन हंगामावर अवलंबून असणाऱ्यांचे कंबरडे मोडले. मृग नक्षत्राचा महिना उजाडला. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मात्र, कोरोनाचे ग्रहण काही सुटले नाही. निवासी शाळा बंद झाल्या आणि पर्यटन व निवासी शाळावर अवलंबून असणारे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले. गेल्या वर्षभरातील कटू परिस्थिती पुन्हा नको या आशेने नवीन वर्षाचे स्वागत केले. मात्र, यावर्षीसुद्धा पाचगणी (Panchgani Village) येथील जनजीवनास अत्यंत भयानक परिस्थितीस जावे लागत आहे.

हेही वाचा: मिनी काश्मिरात पर्यटकांची वर्दळ; पावसात घेताहेत मनसोक्त आनंद

Mahabaleshwar

Mahabaleshwar

सातारा जिल्ह्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी बाजारपेठेत शुकशुकाट, तर प्रेक्षणीय स्थळांवर स्मशान शांतता आहे. कधी ऊन... कधी पाऊस... कधी धुक्याचे साम्राज्य... निसर्गाच्या विविध छटांची मुक्त हस्ते होणारी उधळण, सभोवतालचा डोंगररांगा हिरवळीच्या शृंगाराने सजल्या असल्या तरी वर्षा ऋतूंचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी दाखल होणारे हौशी पर्यटक दृष्टीस पडत नाहीत. उन्हाच्या तीव्रतेने सुवर्ण रंग परिधान केलेले तण बाजूला करून, अनेक ठिकाणी वणव्यामुळे ओसाड झालेल्या डोंगररांगा आता सततच्या पावसामुळे हिरवळीच्या लेण्याने सजल्या असल्या, तरी पर्यटकांविना सारा परिसर जणू ओस झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी अशी दयनीय अवस्था उद्‍भवल्याने पर्यटन उद्योगाची घडी बसणार कधी, या प्रश्‍नाने पाचगणीतील प्रत्येक लहान- मोठे व्यावसायिक चिंतेत आहेत.

Tourist Places In Panchgani Are Waiting For Tourists Satara Marathi News

loading image