महाबळेश्वर : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनातर्फे ता. २ ते ४ मे या कालावधीत ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ चे (Mahabaleshwar Tourism Festival) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास येणाऱ्या पर्यटकांना तीन दिवस टोलमाफी (Toll Exemption) देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.