cm devendra fadnavis
sakal
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) - ‘मराठी भाषा वगळता अन्य कुठल्याही भाषेची सक्ती नाही. त्रिभाषा सूत्रानुसार कोणती भाषा निवडायची याचे स्वातंत्र दिले आहे. मात्र, आता ती कधीपासून निवडायची याबाबत नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या अहवालानुसार निर्णय घेतला जाणार आहे. मराठी भाषेला अभिजातचा दर्जा दिला असून, आता तिच्या लोकमान्यतेसाठी प्रयत्नशील आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथे आयोजित ९९ व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग, मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.