

- सिद्धार्थ लाटकर
सातारा : पालिकेकडून माची पेठ ते देवी चौक या रस्त्यावरील एका बाजूने गटार बंदिस्त करण्यासाठी पाइप टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या हे काम माची पेठेपासून जीवनज्योत रुग्णालयापर्यंत झाले आहे. आगामी काळात वाघाची नळी, देवी चौकापर्यंत काम केले जाणार आहे. दरम्यान हे काम करीत असताना स्थानिकांसह येथील दोन रुग्णालयांत, शाळांमध्ये येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.