खंबाटकी घाटात सकाळी सात वाजल्यापासून मोठी वाहतूक कोंडी; लोणंदला जाणारे वारकरीही अडकले ट्राफिक जाममध्ये!

खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ कंटेनर बंद पडल्याने आज सकाळी सात वाजेपासून वाहतूक पूर्णपणे खोळंबली.
Khambatki Ghat
Khambatki Ghatesakal
Updated on

खंडाळा : खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) दत्त मंदिराजवळ कंटेनर बंद पडल्याने आज सकाळी सात वाजेपासून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली. तद्नंतर तासाभरातच बोगद्यातून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही ठप्प झाल्याने आज सकाळपासून दोन्ही बाजूकडे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.

यामुळे लोणंदला जाणारे वारकरी या ट्राफिक जाममध्ये अडकले आहेत. याबाबत माहिती अशी, की आज सकाळी दत्त मंदिराजवळ कंटेनर बंद पडल्याने हळूहळू वाहनांची संख्या वाढत गेली, यामुळे आज (रविवार) रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक होऊन वाहतूक ठप्प झाली.

Khambatki Ghat
Palkhi Sohala : डोक्यावर टोपी अन् हातात टाळ घेऊन अजितदादांनी पायी चालत पालखी सोहळ्यात घेतला सहभाग; मार्गात कडक पोलिस बंदोबस्त

तर, काहींनी बोगद्या मार्गे आपली वाहने वळवली. दरम्यान, बोगद्याकडून येणारी वाहतूक ही टप्पे झाली. परिणामी, सकाळी सात वाजेपासून आज दुपारपर्यंत वाहतूक टप्पू झाली आहे. तसेच हे चित्र दिवसभर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Anuskura Ghat Traffic
Khandala flyover one lane open
Pune Satara Highway weekend traffic
Landslide near Datt Temple in Khambatki Ghat on Pune Satara Highway
Marathi News Esakal
www.esakal.com