
गोंदवले : लग्न समारंभ आटपून घरी परतणाऱ्या युवकाचा पाय घसरला अन माण नदीच्या पुरात तो वाहून गेल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी पळशी (ता.माण)येथे घडली आहे.नवनाथ पाटोळे(वय३०)असे या बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे.घटनेनंतर सुरू झालेले शोधकार्य अद्यापही सुरूच आहे.