Satara Accident : बनपुरीजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू: मुलगी जखमी; मृत एकावडेवाडीतील

Satara Accident News : ढेबेवाडी- सणबूर मार्गावर बनपुरी (ता. पाटण) जवळ साेमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. पांडुरंग बाबूराव एकावडे (वय ५१, रा. एकावडेवाडी सळवे, ता. पाटण) असे मृताचे नाव आहे.
A tragic car-motorcycle collision near Banpuri claimed the life of a rider from Ekawadewadi, with his daughter injured in the incident.
A tragic car-motorcycle collision near Banpuri claimed the life of a rider from Ekawadewadi, with his daughter injured in the incident.Sakal
Updated on

ढेबेवाडी : कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर मुलगी जखमी झाली. ढेबेवाडी- सणबूर मार्गावर बनपुरी (ता. पाटण) जवळ साेमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. पांडुरंग बाबूराव एकावडे (वय ५१, रा. एकावडेवाडी सळवे, ता. पाटण) असे मृताचे नाव आहे. रेश्मा मानाजी रोडे (वय २६, रा. रोडेवाडी- मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण) या जखमी झाल्या. श्री. एकावडे आपल्या मुलीला घेऊन पुतण्याच्या साखरपुड्याला निघालेले असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com