
खंडाळा : पुणे- सातारा महामार्गावरील शिरवळ (ता. खंडाळा) जवळील पंढरपूर फाटा येथे दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात चुलते- पुतणे ठार झाले. काल रात्री हा अपघात झाला. चुलते अमोल रघुनाथ चव्हाण (वय ४०), पुतणे धनंजय बबन चव्हाण (दोघे रा. भोळी, ता. खंडाळा) अशी त्यांची नावे आहेत.