Transit treatment Centre : वन्य प्राण्यांचे ट्रान्झिट सेंटर रखडले

दप्तर दिरंगाईचा फटका; सातारा, कोल्हापूर, सांगली रत्नागिरी जिल्ह्यांचा तोटा
transit treatment center to treat injured wild animals stalled satara
transit treatment center to treat injured wild animals stalled satarasakal

कऱ्हाड : पश्‍चिम महाराष्ट्रातील वन्य प्राण्यांच्या देखभालीसह जखमींवर उपचारासाठी जिल्ह्यात उभारले जाणारे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर तीन वर्षांपासून रखडले आहे. त्या केंद्रासाठी महाविकास आघाडीने मंजूर केलेली साडेसात कोटींचा निधीही वापराविना पडून आहे. त्या कामात होणारा राजकीय हस्तक्षेप व वन्य जीव विभागाकडून झालेले अक्षम्य दुर्लक्षामुळे केंद्राची इमारत उभारता आली नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या उपचारांची मोठी अडचण होताना दिसते आहे.

महामार्गावरील वराडे (ता. कऱ्हाड) येथे वन्य जिवांवर उपचारांसह त्याच्या देखभालीसाठी अत्याधुनिक वन्यजीव उपचार व देखभाल केंद्र म्हणजे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. अत्याधुनिक उभारणीसाठी त्या केंद्राला सात कोटी ५८ लाखांचा निधी साताऱ्याच्या उपवनसंरक्षकांकडे वर्ग झाला होता.

मात्र, त्याचे काम रखडले आहे. तत्कालीन सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून निधी मंजूर झाला होता. त्यामुळे वराडे येथे पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीवांसाठीचे अत्याधुनिक उपचार सुसज्ज वन्यजीव उपचार व देखभाल केंद्र मंजूर उभारले जाणार होते. मात्र, केवळ दप्तर दिरंगाईचा फटका बसल्याने ते काम रखडले आहे.

साताऱ्यासह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्यजीवांना तातडीचे उपचार मिळण्यास मदत होणार होती. मात्र, तीन वर्षांपासून त्या कामाकडे होणारे दुर्लक्ष वन्यजीवांच्या जिवावर बेतले आहे.

जखमी श्‍वापदांवर उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा होतो. मात्र, वन्यश्वापदांवर उपचारासाठी खास सुविधांची गरज असते. कमीत कमी मानवी संपर्कासह श्वापदावर तातडीने उपचार गरजेचे असतात.

उपचारानंतर त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडणे आवश्यक असते. त्या दृष्टीने रेडीओथेरपी, पोर्टेबल एक्स-रे सारख्या सुविधा उपचार केंद्राची या ट्रान्झिट सेंटरला सोय होणार होती. मात्र, ते काम रखडल्याने त्या सगळ्या सुविधा अद्यापही आलेल्या नाहीत.

राजकीय हस्तक्षेप...

वन्य प्राण्यांसाठीचे ट्रान्झिट सेंटरच्या निधीवरून राजकारण झाल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. काही नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने ठेकेदार त्या कामाला सुरुवात करत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ट्रान्झिट सेंटरचे काम रखडण्यामागे राजकीय हस्तक्षेपाचेही कारण असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com