esakal | साताऱ्याच्या वीरपुत्रास कुपवाडात '41 राष्ट्रीय रायफल्स'कडून मानवंदना; महाडिकांच्या बलिदानास पाच वर्षे पूर्ण!
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्याच्या वीरपुत्रास कुपवाडात '41 राष्ट्रीय रायफल्स'कडून मानवंदना; महाडिकांच्या बलिदानास पाच वर्षे पूर्ण!

कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. महाडिक यांनी सातारा जिल्ह्याचाच नव्हे, तर आपल्या बलिदानाने देशाची मान उंचावली आहे. महाडिक यांनी SP, SM21 प्यारा एफ से 16 जुलै 2014 रोजी 41 राष्ट्रीय रायफलचे अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता.

साताऱ्याच्या वीरपुत्रास कुपवाडात '41 राष्ट्रीय रायफल्स'कडून मानवंदना; महाडिकांच्या बलिदानास पाच वर्षे पूर्ण!

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक हे 17 नोव्हेंबर 2015 रोजी कुपवाडा जिल्ह्यातील मनिगाह, हमनदर परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. 1998 मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले होते आणि त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना सेना पथकानेही गौरविले होते. 

कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. शहीद महाडिक यांनी सातारा जिल्ह्याचाच नव्हे, तर आपल्या बलिदानाने देशाची मान उंचावली आहे. महाडिक यांनी SP, SM21 प्यारा एफ से 16 जुलै 2014 रोजी 41 राष्ट्रीय रायफलचे अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. कर्नल महाडिक हे कुपवाडा येथे एक हरहुन्नरी अधिकारी म्हणून प्रसिद्ध झाले होते. दहशतवाद्यांशी लढत असतानाच त्यांनी तिथे स्थानिक नागरिकांसाठी विविध उपक्रम हाती घेतले होते.

व्वा! क्या बात है.. नेता हो तो ऐसा; रोहित पवारांच्या मदतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा 

महत्त्वाचे म्हणजे, जे तरुण दहशतवादी संघटनेकडे आकर्षित होत होते, त्यापासून त्यांना परावृत्त करून शिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाला त्यांनी हमदर्द असे नाव ठेवण्यात आले होते. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जे ऑपरेशन राबवले होते, त्यास "ऑपरेशन संतोष" असे नाव ठेवण्यात आले, तसेच शहीद कर्नल महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यादेखील सध्या देशसेवेसाठी रुजू आहेत. आशा नाना विविध कलांमध्ये, तसेच लोकांप्रती व देशाप्रती असलेल्या एकनिष्ठ अधिकाऱ्यास कुपवाडा येथे 41 राष्ट्रीय रायफल्सकडून शहीद कर्नल संतोष महाडिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top