esakal | आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बोलून बातमी शोधा

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण}

उर्वरित विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून संस्थेच्या माध्यमातून सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर्स व कर्मचारी काळजी घेत आहेत.

satara
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
sakal_logo
By
रमेश धायगुडे/ संताेष चव्हाण

लोणंद (जि. सातारा) : पाडेगाव (ता. खंडाळा) येथील मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेच्या समता आश्रमातील 12 विद्यार्थ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य तपासणीत स्पष्ट झाले आहे. या सर्वांना संस्थेच्या इमारतीत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. संस्था व आरोग्य विभागाच्या वतीने सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील व संस्थेचे सचिव पवन सूर्यवंशी यांनी दिली.
 
या आश्रमशाळेतील 146 विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे घेतलेले नमुने तपासणीत निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून संस्थेच्या माध्यमातून सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर्स व कर्मचारी काळजी घेत आहेत. 

उंब्रजच्या 6 विद्यार्थ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

उंब्रज : येथील रुक्‍मिणीबाई कदम कन्या विद्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या सहा विद्यार्थिनींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी दिली.

दरम्यान, बाधित विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या इतर मुलींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने विद्यार्थिनी, पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल समिती व शाळा व्यवस्थापन समितीच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.

कऱ्हाडकरांनाे! जाणून घ्या अर्थसंकल्पातील जनशक्तीची उपसूचना

210 रुपयांना खरेदी केलेली लस सामान्यांना 250 रुपयांना दिली जात आहे : पृथ्वीराज चव्हाणांचा आराेप

साखरेचा तुम्हाला त्रास होतोय?, मग हे 4 निरोगी पर्याय आपली वाट पाहताहेत!

जेव्हा तुमचे मूल आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगताेय; जाणून घ्या काय करावे

भारतीय मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीवर फलटणच्या वैशाली शिंदे; रेल्वेमंत्री गोयलांकडून नियुक्ती

Edited By : Siddharth Latkar