
कऱ्हाड : मागील पंधरवड्यात पोलिसांनी येथे पकडलेल्या एमडी ड्रग्जच्या रॅकेटमध्ये दोन बड्या घरातील दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. एकास काल रात्री, तर दुसऱ्यास आज पहाटे पुण्याच्या विमानतळावरून अटक केली आहे. सौरभ संदीप राव व सुजल उमेश चंदवानी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. चंदवानीला पुण्याच्या विमानतळावरून अटक केली. तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेतले.