सातारा : खंबाटकी घाटाजवळील (Khambatki Ghat) बंद ढाब्याच्या पाठीमागे टँकरमधील गॅस चोरून तो व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये (Cylinder) भरणाऱ्या टोळीतील दोघांना मुंबईच्या शिधा पुरवठा पथकाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले. त्यांचे चार साथीदार पळून गेले असून, अटकेतील दोघांकडून ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.