
संगममाहुली: सत्यमनगर (संगममाहुली) येथे दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी ५० लाख रुपये देण्यास नकार दिल्यामुळे शिवीगाळ व दमदाटी करून दोन लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी व वीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.