अभ्यासासाठी गेलेल्या मुली घरी परतल्याच नाहीत! शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू; आशा सेविकेने वाचविले दोघींचे प्राण

आशा सेविकेने (Asha Sevika) प्रसंगावधान राखत जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन मुलींना बाहेर काढले.
Tapola Shivsagar Reservoir Mahabaleshwar
Tapola Shivsagar Reservoir Mahabaleshwaresakal
Summary

धरणात असलेल्या मच्छिमार लोकांनी बोटीने येऊन सोनाक्षी कदमला पाण्यातून बाहेर काढले.

कास / महाबळेश्‍वर : तापोळा भागातील दुर्गम वाळणे (ता. महाबळेश्वर) या गावातील चार मुली काल शिवसागर जलाशयात (Shivsagar Reservoir) खेळताना बुडाल्या. यातील एक मुलीचा जाग्यावरच मृत्यू झाला, तर एकीला तापोळा येथील आरोग्य केंद्रात (Health Center) नेल्यावर मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, आशा सेविकेने (Asha Sevika) प्रसंगावधान राखत जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन मुलींना बाहेर काढले. त्यातील दोघींना वाचविण्यात त्यांना यश आले. सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२), सोनाक्षी तानाजी कदम (वय १२) अशी मृत झालेल्या मुलींची नावे आहेत. रविवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला असून, शुभांगी सुनील तांबे असे मुलींचा जीव वाचविणाऱ्या या आशा सेविकेचे नाव आहे.

Tapola Shivsagar Reservoir Mahabaleshwar
Kolhapur Crime : धक्कादायक! प्रियकराचा खून करून मृतदेह घाटात टाकून जाळण्याचा प्रयत्न; खोपोलीतील महिलेचं कृत्य

याबाबत घटनास्थळावर व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे वाळणे येथे शुभांगी सुनील तांबे या आशा सेविका आहेत. त्यांची मुलगी हर्षदा सुनील तांबे हिच्यासोबत अभ्यास करण्यासाठी रविवारी सकाळी आर्या दीपक नलावडे (वय १२), सृष्टी सुनील नलावडे (वय १३), सोनाक्षी तानाजी कदम (वय १२), सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२, सर्व रा. वाळणे, ता. महाबळेश्‍वर) या शुभांगी तांबे यांच्या घरी आल्या होत्या. त्या सर्व मैत्रिणी असल्याने एकत्र अभ्यास करीत होत्या. साडेबाराच्या सुमारास मुलींच्या आवाज ऐकू येत नसल्याने शुभांगी या काय झाले आहे हे पाहण्यासाठी बाहेर आल्या.

त्यावेळी त्यांना घराजवळ असलेल्या धरणाच्या दिशेला मुलींचा आरडाओरडा ऐकू आल्याने त्या धावत आवाजाच्या दिशेन धरणाकडे गेल्या. त्यांना मुली बुडत असल्याचे दिसतात त्यांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. बुडत असलेल्या आर्या नलावडे हिला बाहेर काढले व पुन्हा पाण्यात उडी मारून सृष्टी नलावडे हिस बाहेर काढले. त्यानंतर सोनाक्षी सुतार हिस बाहेर काढत आरडाओरडा केला. त्यामुळे धरणात असलेल्या मच्छिमार लोकांनी बोटीने येऊन सोनाक्षी कदमला पाण्यातून बाहेर काढले.

Tapola Shivsagar Reservoir Mahabaleshwar
हृदयद्रावक! वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यानंतरही जुळ्या बहिणींनी दिला पेपर; अश्रूंना रोखत दहावीच्या आव्हानाला दिलं तोंड

यातील सोनाक्षी सुतारचा जागीच मृत्यू झाला, तर सोनाक्षी कदम हिला आरोग्य केंद्रात मृत घोषित करण्यात आले. सृष्टी नलावडे हिच्यावर तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. आर्या नलावडे ही व्यवस्थित असल्याने घरी आहे. याबाबतची फिर्याद शुभांगी यांनी महाबळेश्‍वर तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com