MD Drugs Seized : कऱ्हाडच्या शेणोली गावाजवळ एमडी ड्रग्जसह दोघांना सापळा रचुन पोलिसांनी घेतले ताब्यात

शेणोली एसटी थांबा परिसरात एमडी ड्रग्ज मॅफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या दोघांना तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात.
MD Drugs Seized

MD Drugs Seized

esakal

Updated on

कऱ्हाड - शेणोली एसटी थांबा परिसरात एमडी ड्रग्ज मॅफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या दोघांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसुन चौकशी केल्यावर त्यांच्या ताब्यातून १.८९० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज दोन मोबाईल, दुचाकी असा ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय यशवंत कापूरकर (रा. जुळेवाडी, ता. कऱ्हाड) याला ताब्यात घेण्यात आले असुन यात एका अल्पवयीनाचाही सहभाग असल्याचे तालुका पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी सांगीतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com