
सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिस दलातील सहायक फौजदारासह दोघे आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्यासमोर स्वत:हून हजर झाले. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.