Satara : भुईंजच्या दोघांकडून गावठी पिस्तूल जप्त: शाहूपुरी पोलिसांची कारवाई; संशयितांना अटक

दुचाकीवरून येणाऱ्या दोघांकडे पिस्तूल असल्‍याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सापळा रचला होता. यादरम्यान दोघे जण संशयितरीत्‍या फिरताना दिसले. त्यांना थांबण्यास सांगितले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्‍न केला.
Seized country-made pistols displayed by Shahupuri Police after arresting two suspects in Bhuinj.
Seized country-made pistols displayed by Shahupuri Police after arresting two suspects in Bhuinj.Sakal
Updated on

सातारा : बेकायदा गावठी पिस्तूल बाळगल्‍याप्रकरणी भुईंज (ता. वाई) येथील दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी व पिस्तूल असा सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रवी रवींद्र जाधव (वय २३) व रेवणसिद्ध भीमाअण्णा पुजारी (वय २७, दोघे रा. भुईंज, ता. वाई) अशी त्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com