शिक्षक कोरोनाबाधित; विद्यार्थ्यांच्या पालकांनी काळजी घ्यावी

रुपेश कदम
Sunday, 7 March 2021

मलवडी गावात कुठेही भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात या कालावधी व्यतिरिक्त इतर वेळेत दुकाने सुरू ठेवणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. 

दहिवडी (जि. सातारा)  : मलवडी (ता. माण) येथील त्रिंबकराव काळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या शाळेतील दोन शिक्षक कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे 13 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या या शाळेचे मुख्याध्यापक 22 फेब्रुवारी रोजी कोरोनाबाधित आले होते. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी 2 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 3 मार्च रोजी शाळा सुरू करण्याबाबत बैठक घेऊन 4 मार्चला इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते.

मात्र, 4 व 5 मार्च रोजी शाळेचे कामकाज झाले. 4 मार्च रोजी शाळेतील 17 शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल 5 मार्च रोजी सायंकाळी आला. त्यात दोन शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शाळा व ग्रामस्थांत खळबळ माजली. फक्त दोनच दिवस शाळेचे कामकाज सुरू राहिले अन्‌ लगेच शाळा बंद करण्यात आली.
 
शिक्षक हे कोरोना चाचणी घेतली त्यादिवशी व अहवाल आला त्यादिवशीही शाळेत अध्यापनाचे काम करत होते. त्यामुळे इतर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच संपूर्ण परिसरात या शाळेत परिसरातील दहा-बारा गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. लक्षणे आढळल्यास तत्काळ अथवा न आढळली तरी शक्‍य असल्यास संबंधित विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी. ज्यामुळे पुढील संभाव्य धोका टाळण्यास मदत होईल. यासोबतच मलवडी गावात कुठेही भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात या कालावधी व्यतिरिक्त इतर वेळेत दुकाने सुरू ठेवणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. 
 

कानून के हाथ बहुत लंबे होते है! पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला साताऱ्यात अटक

संतापाशी बहू असावी मर्यादा शिकवण द्यावी लागेल; पंढरीच्या मठातील धरपकडीवर अक्षयमहाराज आक्रमक

खळबळजनक घटना: आई वडिलांनी मुलीचा मृतदेह परस्पर पुरला

सोसायटी ठरावावरून राडा; राजकारणातील गुन्हेगारी मोडण्यात प्रशासन कुचकामी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Teachers From Malvdi Tested Covid 19 Positive Satara Marathi News