‘माणदेशी’च्‍या दोघी भारतीय हॉकी संघात

काजल आटपाडकर, अश्विनी कोळेकर यांची निवड; नेदरलँड येथे होणार स्‍पर्धा
two women hockey player selected for team india kajal aatpadkar and ashwini kolekar satara
two women hockey player selected for team india kajal aatpadkar and ashwini kolekar satarasakal
Updated on

म्हसवड : येथील माणदेशी चॅम्पियन्सच्या काजल आटपाडकर, अश्विनी कोळेकर या दोन खेळाडूंची भारतीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे, अशी माहिती माणदेशी फाउंडेशन संचलित माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. आयर्लंडमधील डब्लिन येथे होणाऱ्या अंडर २३ या गटात होणाऱ्या पाच राष्ट्राच्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर महिला हॉकी टीमची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये २० खेळाडूंची निवड करण्यात आली असून माणदेशी चॅम्पियन्सची खेळाडू अश्विनी कोळेकर हिची बचावपटू म्हणून तर काजल आटपाडकर हिला फॉरवर्ड खेळाडू २० म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघ नेदरलँड, आयर्लंड, यूएसए आणि युक्रेन यांच्या विरुद्ध खेळणार आहेत. या स्पर्धा १९ जून ते २६ जून या दरम्यान नेदरलँड येथे होणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

माणदेशी फाउंडेशनने येथील मेगा सिटीत सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारले असून या क्रीडा संकुलात क्रीडांगण, आधुनिक जलतरण तलाव, व्यायामासाठी जिम, तसेच मॅटवरील कुस्ती प्रशिक्षकांसह इतर क्रीडा प्रशिक्षणाची सुविधा केली आहे. याचा फायदा माणदेशी विशेषत: मुलींना होत असून येथे प्रशिक्षण घेतलेले खेळाडू देश-विदेश पातळीवरील क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन ते यशस्वी होत असल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी व्यक्त केली. अश्विनी कोळेकर व काजल आटपाडकर दोन्ही माणदेशी चॅम्पियन्सची भारतीय हॉकी संघात निवड झालेबद्दल सिन्हा यांनी त्यांचे अभिनंदन केले. याबरोबरच चॅम्पियन्सचे क्रीडा प्रशिक्षक श्रीराम बाबर, धूळा कोळेकर, कोंडीबा वीरकर, महालिंग खांडेकर, अक्षय दीडवाघ व सूरज काटकर यांचेही चेतना सिन्हा, प्रभात सिन्हा व माणदेशी फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com