childrens life
sakal
मलकापूर - काल- परवापर्यंत आईच्या मायेच्या कुशीत अन् वडिलांच्या आधाराने वाढणाऱ्या दोन चिमुरड्यांच्या आयुष्यात एका रात्रीत काळोख पसरला. चौथीत शिकणारा मुलगा आणि दुसरीत शिकणारी त्याची बहीण पोरकी झाली, त्यांची आई रोहिणी जांभळे यांचा दुर्दैवी अंत झाला, तर पत्नीच्या खुनात वडील दत्तात्रय पोलिसांच्या ताब्यात गेल्याने दोन्ही मुलांच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र एकाच रात्री हरपले. त्यांचा सांभाळ अन् शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार आणि त्यांच्या भविष्याला आधार कोण देणार? हा प्रश्न मात्र आजतरी आव्हानात्मक बनून पुढे आला आहे.