नदीत उडी मारलेल्या मुलीचे दोन युवकांनी वाचवले प्राण

कऱ्हाड येथील कोयना नदीवरील ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरून एका मुलीने काल रात्री उशिरा उडी मारली.
River
RiverSakal
Summary

कऱ्हाड येथील कोयना नदीवरील ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरून एका मुलीने काल रात्री उशिरा उडी मारली.

कऱ्हाड - येथील कोयना नदीवरील (Koyana River) ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरून एका मुलीने (Girl) काल रात्री उशिरा उडी (Jump) मारली. पुलावरून दुचाकीवरून जाणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तेथे गर्दी केली. दरम्यान, गारवडे येथील एक युवक कामावरून घरी जाताना तोही तेथे थांबला. त्याने येथील एका युवकाने (Youth) नदीपात्रात उतरून संबंधित मुलीला नदीतून बाहेर काढून तिचा जीव (Life Saving) वाचवला.

River
MIDC पळवण्याचा कट उधळून लावू; खासदार रणजितसिंहांचा इशारा

वारुंजी परिसरातील एका मुलीने ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलावरून नदीत उडी मारली. रात्रीचा अंधार असल्याने मुलगी सापडेल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, दोन जिगरबाज युवकांनी क्षणाचाही विचार न करता नदीत उतरून त्या मुलीला बाहेर काढले. दरम्यान, नागरिकांच्या मदतीने संबंधित मुलीला उपचारासाठी येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित मुलीने नेमकी नदीत उडी का मारली याचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com