
उडतारे : यशवंत शिक्षण संस्था, सुरूरच्या बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतारे (ता. वाई) येथे सन १९९५च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने जुने सवंगडी तब्बल ३० वर्षांनी एकत्र आले. या वेळी शाळेतील विविध आठवणींना उजाळा मिळाला.