esakal | जिल्हा परिषदेत एजंटगिरी चालू देणार नाही; उदय कबुलेंचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेत एजंटगिरी चालू देणार नाही; उदय कबुलेंचा इशारा

जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांनीही सूचना, माहितीपत्रके जिल्हा परिषदेच्या संकेस्थळावर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

जिल्हा परिषदेत एजंटगिरी चालू देणार नाही; उदय कबुलेंचा इशारा

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : जिल्हा परिषदेत होणाऱ्या अनुकंपातील भरतीसाठी उमेदवारांची प्रतीक्षासूची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीचा गैरफायदा घेऊन काही एजंटांकडून उमेदवारांना पैशाचे आमिष दाखवून दिशाभूल केली जात आहे. अनुकंपातील भरती पारदर्शी होणार असून, पैशाबाबत उमेदवारांना फोन अथवा काही संदेश आल्यास जिल्हा पोलिस प्रशासन, लाचलुचपत विभाग अथवा जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधावा. या अज्ञात व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असून, जिल्हा परिषदेत कोणतीही एजंटगिरी चालू देणार नसल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी साेमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
 
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव आदी उपस्थित होते. 

श्री. कबुले म्हणाले, ""शासकीय कर्मचारी नोकरीत असताना निधन झाल्यास त्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्तीचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे या भरतीस असणाऱ्या अटी व शर्ती दिलेल्या नियमानुसारच कार्यवाही होणार आहे. मात्र, अनुकंपातील भरतीबाबत पात्र उमेदवारांना काही अज्ञात व्यक्तींकडून चुकीची माहिती मिळत आहे. या भरतीत कोणत्याही प्रकारची पैशाची देवाण- घेवाण होत नाही. त्यामुळे भरतीतील पात्र उमेदवारांशी आम्ही संवाद साधून याची माहिती दिली आहे.''
 
श्री. गौडा म्हणाले, ""अनुकंपातील भरती अतिशय पारदर्शी होणार आहे. यासंदर्भात कोणीही पैशाची मागणी केल्यास पात्र उमेदवारांनी लाचलुचपत विभाग (dyspacbsatara@mahapolice.gov.in) 02162-230688 या क्रमांकावर व जिल्हा परिषदेच्या (ceozp.satara@maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर संपर्क साधवा.'' 


ऑनलाइन सभा होणार 

कोरोनाची संख्या वाढल्याने जिल्हा परिषदेत होणाऱ्या विषय समिती, स्थायी समिती सभा व पंचायत समितीच्या मासिक सभा पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाइन होणार असल्याचे सीईओ विनय गौडा यांनी सांगितले आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांनीही सूचना, माहितीपत्रके जिल्हा परिषदेच्या संकेस्थळावर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

न्यायालयाने तोडगा काढा सुचविल्याने कऱ्हाड पोलिसांसह पालिकेची उडाली भंबेरी

Indian Air Force Jobs : दहावी पास आहात! भारतीय वायुसेनेत 1500 जागांची बंपर भरती

कोरोना चाचणी केल्यासच कऱ्हाड पालिकेत प्रवेश; मुख्याधिकारी डाकेंचा सक्त आदेश

वाढेतील हॉटेलवर सातारा पोलिसांचा छापा; जुगार खेळणाऱ्या सात बड्या व्यापाऱ्यांना अटक

घाबरु नका! साताऱ्यात तालुकानिहाय 30 बेडचे कोरोना सेंटर; आरोग्य विभागाकडून सतर्कता

Edited By : Siddharth Latkar

loading image