
कोर्टानं भाजप आमदारांना न्याय दिला; उदय सामंत
कऱ्हाड : कोर्टाने भाजपच्या आमदरांना न्याय दिला. तसाच राज्यपाल नियुक्त आमदरानांही न्याय मिळेल, अशी माझी व्यक्तीगत भावना आहे. त्याचा पक्षाशी अथवा नेत्यांचाही काहीही संबध नाही. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून मी कोर्टात जाण्याचा विचार करत आहे. अर्थात त्याबाबत उद्या मुबंईमध्ये गेलो की त्या विधी तज्ञांशी बोलून त्याबाबतचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे उद्या त्याचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.
भाजपच्या निलंबीत आमदरांना कोर्टात दिलासा मिळू शकतो तर राज्यपाल नियुक्त आमदरांनाही तो दिलासा मिळू शकतो एवढीच शुद्ध बावना माझी आहे. ती माझी व्यक्तीगत आहे. यामध्ये राज्यपालांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नाही. त्यांचा आदर राखून राज्यपाल नियुक्त आमदार निवडीसाठी माझे प्रयत्न सुरू राहतील, असेही स्पष्टीकरण मंत्री सामंत यांनी दिले. नितेश राणे यांच्यासंदर्भात मंत्री सामंत म्हमाले, आज त्यांच्या अर्जावर सुनीवणी आहे. कोर्ट जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल.
Web Title: Uday Samant Court Bjp Mla Governer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..