
सातारा : कृष्णा नदीकाठावर वसलेल्या वाईला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व आहे. या शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कृष्णा नदीचे शुद्धीकरण आणि सौंदर्यीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांना भेटून निवेदन दिले. यात कृष्णा नदी शुद्धीकरणासाठी जय जय कृष्णे प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.