
सर्वांनी जबाबदारीने वागा : उदयनराजे
सातारा : कोणत्याही सबबी न सांगता गेली दीड वर्षे सातारा नगरपालिका (satara muncipal council) नागरिकांच्या आरोग्य (health) सेवेसाठी कार्यरत असून, यापुढील काळात पालिकेबरोबरच सातारकरांनी अधिक जबाबदारीने वागण्याचे आवाहन खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी केले आहे. कोरोनाकाळात (coronavirus pandemic) नगरपालिकेने स्वखर्चातून आजपर्यंत 2 हजार 800 जणांवर अंत्यसंस्कार केल्याची माहितीही त्यांनी दिली. (udayanraje-bhosale-appeals-citizens-take-care-in-covid19-pandemic-satara-trending-news)
कोरोना (corona) व लॉकडाउनमुळे (lockdown) जनजीवन ठप्प असतानाही सातारकरांच्या आरोग्यासाठी पालिकेचे सर्व विभाग आरोग्य सेवेसाठी अविरत कार्यरत आहेत. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवत असतानाच पालिकेने नागरिकांना आधार देण्याचे काम केले आहे. लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या छोट्या व्यावसायिकांना मदतीचा हात देतानाच शहराचे आरोग्य अबाधित राखत नागरिकांच्या सोयीसाठी दोन लसीकरण केंद्रे सुरू केली.
कामासाठी सतत झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी काळात सातव्या वेतन आयोगाची रक्कम प्रदान करण्याची कार्यवाही पालिकास्तरावर करण्यात येत आहे. कोरोना काळात विविध ठिकाणी उपचार घेत असताना मृत झालेल्या सुमारे 2 हजार 800 जणांवर पालिकेने स्वखर्चातून अंत्यसंस्कार केल्याचेही उदयनराजेंनी नमूद केले आहे. नागरिकांनी कोरोनापासून स्वत:चा बचाव करत इतरांची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.