
सातारा : गुरुवर्य (कै.) लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचा (जिहे- कठापूर योजना) समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना फेज दोनमध्ये करावा, तसेच कृष्णा नदी प्रदूषणरहित करून सौंदर्यीकरण करण्यासाठी स्वतंत्र स्वायत्त संस्थेची स्थापना करावी. नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि कृष्णा योजना राबवावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.