

सातारा : मंजूर ईएसआयसी हॉस्पिटलची उभारणी एमआयडीसीतील जागेवर तातडीने सुरू करावी, तसेच छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ॲथलेटिक्सपटूंसाठी सिंथेटिक ट्रॅक आणि बास्केटबॉलसाठी इनडोअर बास्केटबॉल कोर्ट तयार करावे, आर्चरी खेळासाठी मैदानासह अन्य सुविधा निर्माण कराव्यात, आदी मागण्या आज खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय क्रीडा, कामगार आणि रोजगारमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.