
सातारा : शिवाजी महाराजांनी उपेक्षित समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला, तसेच राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा, यासाठी प्रयत्न केले. त्यांचा पुतळा जपानमध्ये उभारला जात आहे. यातून महाराजांचे विचार आणि आदर्श संपूर्ण जग घेत आहे, हे स्पष्ट होते. आता हा आदर्श युक्रेनसारख्या देशांनी घ्यावा, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.