काकांनी उदयनराजेंना राजकारणातील 'हिरो' बनविले

काकांनी उदयनराजेंना राजकारणातील 'हिरो' बनविले
Updated on: 

सातारा : माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर (काका) यांच्या वाढदिवसानिमित्त  15 जूलै 2018 मध्ये साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काकांच्या साताऱ्यातील घरी जाऊन भेट घेतली हाेती. त्यांनी विलासकाकांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांत अर्धातास जिल्ह्यातील राजकारणावर चर्चा देखील झाली हाेती. 

काकांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. पण खासदार उदयनराजेंशी त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाविषयी चर्चा केली. उदयनराजेंनी काकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस ही केली. यावेळी दोन्ही नेत्यांत सुमारे तासभर राजकीय विषयावर चर्चा रंगली होती.

सलग सात वेळा आमदार राहिलेल्या विलासकाकांचा असा झाला राजकीय प्रवास
 
त्यावेळी खासदार उदयनराजे व राष्ट्रवादीच्या नेत्यांत सुरू असलेल्या कलगीतुऱ्याचाही यावेळी उहापोह झाला. यावेळी विलासराव उंडाळकर यांनी खासदार उदयनराजे म्हणजे राजकारणातील हिरो आहेत. त्यांची राजकीय खलबते राजकारण्यांसह सर्वांनाच विचार करायला लावतात, अशा शब्दात उदयनराजेंची स्तुती केली हाेती. उदयनराजे भाेसले यांच्यावर विलासराव पाटील उंडाळकर यांचे विशेष प्रेम हाेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli District Bank Election
Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
Khambatki Ghat Traffic Jam on Pune-Satara Highway
Satara Munawale Water Tourism Centre Reopens With Adventure Sports And Modern Freshwater Tourism Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com