उदयनराजेंचा सिंघम स्टाईल अंदाज; 'अभी के अभी' म्हणत उडवली पुन्हा काॅलर

उमेश बांबरे
Friday, 8 January 2021

आज ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. तसेच सातारच्या जनतेची साथ मिळाली. या अगोदरही जी वचने आम्ही दिली ती पूर्ण केली आहेत असे खासदार उदयनराजेंनी नमूद केले.

सातारा : येथील पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामाची पहाणी दाै-या निमित्त आलेल्या खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज (शुक्रवार) चक्क फित कापून रस्ता खूला केल्याचे जाहीर केले. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले आजपासून, हाेय रस्ता आजपासून जनतेसाठी खूला झालेला आहे. ते काय म्हणतात, अभी के अभीच असा सिंघममधील डायलाॅग ही म्हटला.  दरम्यान जशी  इतरांची स्टाईल असते. तशी माझीही स्टाईल आहे. मी केलेल्या कामाबद्दल मला कोणी शाबासकी देऊ अन्यथा न देऊ स्वतः ला शाबासकी देण्याची माझी पध्दत आहे, असे सांगत त्यांनी कॉलर उडविली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहारज असा जल्लोष केला.  

येथील ग्रेड सेपरेटरच्या कामाचे आज अचानक खासदार उदयनराजे भोसले यांनी उद्‌घाटन केले. त्यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे तसेच सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.  पहाणीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, सातारकरांसह माझ्यासाठी आज हा ऐतिहासिक क्षण असून लोकांची मागणी होती. पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात. तेथे वाहतूकची कोंडी होत होती. पर्यटक, व्यापारी व नागरीकांना त्रास सहन करावा लागत होता. सातारा विकास आघाडी पालिकेच्या सत्तेत आली. त्यावेळी नेहमीप्रमाणे आम्ही याबाबतच आश्वासन दिले होते. त्याची प्रत्यक्ष कृती आम्ही केली आहे. 

ठरलं तर! प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय आठवडाभरात; पृथ्वीराज चव्हाणांचे सूतोवाच 

चंद्रकांत पाटलांना आता विश्रांती गरज; जयंत पाटलांचा टाेला 

आज ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. तसेच सातारच्या जनतेची साथ मिळाली. या अगोदरही जी वचने आम्ही दिली ती पूर्ण केली आहेत. यापुढे देखील सातारकरांसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जे लोक आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी व उज्वल वाटचालीसाठी प्रयत्न करत राहणार आहे. कुठेही कमी पडणार नाही. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी उदयनराजेंना ग्रेड सेपरेटर जनतेसाठी कधी खुला हाेणार असा प्रश्न विचारला. त्यावर राजेंनी खड्या आज आज असे दाेन वेळा सांगून ते काय म्हणतात अभी के अभीच हा सिंघममधील डायलॉग हाणला. त्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला. 

नवरा बायकाेत रंगलंय जिरावा जिरवीचे राजकारण; ग्रामपंचायत निवडणुकीत हाय व्हाेलटेज ड्रामा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Inagurated Grade Seprator Project In Satara Trending News