साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांचं होणार भव्य स्मारक; संस्थेचं अध्यक्षपद उदयनराजेंकडे, शासनाकडून 'इतके' कोटी मंजूर

छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये मंजूर
Udayanraje Bhosale Chhatrapati Sambhaji Maharaj
Udayanraje Bhosale Chhatrapati Sambhaji Maharajesakal
Summary

या उपक्रमासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान या नावाने संस्था स्थापन केली आहे.

सातारा : सातारा नगरीत छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial) होणार आहे. या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले असून, यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठानची रितसर नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

Udayanraje Bhosale Chhatrapati Sambhaji Maharaj
Kolhapur : मोदींची ताकद वाढवण्यासाठी तिकडे गेले, मग शरद पवारांची ताकद का वाढवली नाही; रोहित पवारांचा मुश्रीफांना सवाल

खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि आपल्या सर्वांचे जाज्वल्य स्फूर्तिदायी व्यक्तिमत्त्व म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांना उभा देश ओळखतो. साताऱ्यात त्यांनी त्याकाळी केलेल्या अवर्णनीय बाबी खूप मोठ्या संख्येने आहेत.

असे असूनही छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक साताऱ्यात नाही. याची उणीव भासत होती. ऐतिहासिक व्यक्तीचे स्मारक होण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागत आहेत. तरीसुद्धा काहीही झाले तरी छत्रपती संभाजी महाराज यांचे मोठे स्मारक साताऱ्यात उभे करण्याचा संकल्प सोडला होता. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे (Maharashtra Government) पाठपुरावा केला आहे.

Udayanraje Bhosale Chhatrapati Sambhaji Maharaj
Sharad Pawar : 'बाप हा बापच असतो'; शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वीच कोल्हापुरात बॅनरबाजी, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार

या उपक्रमासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान या नावाने संस्था स्थापन केली आहे. यामध्ये पत्रकार हरीश पाटणे हे उपाध्यक्ष तसेच गोडोलीचे विलास शिंदे यांची सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वांचा आग्रह झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्षपद आम्ही स्वीकारले आहे.

या संस्थेत दत्तात्रय बनकर, पत्रकार शरद काटकर, विनोद कुलकर्णी, मनोज शेंडे, वसंत लेवे, संजय पाटील, किशोर शिंदे, संग्राम बर्गे, अमित कुलकर्णी, अभिजित बारटक्के, ईशाद बागवान, सुजित जाधव, सचिन साळुंखे, अमोल तांगडे यांचा समावेश आहे. स्मारकाचे संपूर्ण काम सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी नुकताच दोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

Udayanraje Bhosale Chhatrapati Sambhaji Maharaj
Sharad Pawar : कोल्‍हापुरात धडाडणार शरद पवारांची तोफ; निशाण्यावर कोण अजितदादा की मुश्रीफ? उत्‍सुकता शिगेला

छत्रपती संभाजी महाराज यांचा त्यांच्या लौकिकास शोभून दिसेल, असा पुतळा आणि स्मारक उभारणी तसेच त्यानंतर त्याची निगा राखण्यासाठी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सूचना प्रस्तावित केल्या जाणार आहेत.

- उदयनराजे भोसले, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com