...यांना कूठली भाषा कळती तेच समजेना; उदयनराजे साता-यात गरजले

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 28 January 2021

मला सगळ्या नेत्या मंडळींना सांगू वाटते लाेकांचा अंत पाहू नकाे. एकदा जर उद्रेक झाला तर थांबवणार काेण. काेण पुढे जाणार, मी ठरवले तरी तुम्हांला काय करु शकताे असं असं करु नका अशी चिंता उदयनराजेंनी व्यक्त केली.

सातारा : मराठा नेत्यांना कुटुंबातील मुलं भविष्यात विचारतील का झालं नाही? मग तुम्ही तेव्हा काय उत्तर देणार. बास झालं आता. सारखं राजकारण राजकारण किती...अं, आता यांना कूठली भाषा कळती तेच समजेना. अहाे लाेकांचे जीव गेले आता हाेणे बाकी आहे अशी चिंता खासदार उदयनराजे भाेसले यांनी मराठा आरक्षणाबाबत व्यक्त केली.

(कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने सातारा जिल्ह्यात विकास फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. त्याचे उदघाटन येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी खासदार उदयनराजे भाेसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले, ज्येष्ठ नेते दिलीप येळगावकर आदी उपस्थित आहेत. 

उदयनराजे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी मूठभर लाेकांना घेऊन राज्य स्थापित केले. त्यांचे कार्य अलाैकिक आहे. त्यांचाच विचार घेऊन अण्णासाहेबांनी देखील संपुर्ण आयुष्य वेचले. कष्टक-यांसाठी झटले.  लाेकप्रतिनिधी या नात्याने भेदभाव करणे शाेभत नाही. दूस-याचे आरक्षण काढून आम्हांला नकाे आहे. जसे त्यांना दिले तसे आम्हांला द्या एवढीच मराठा समाजाची मागणी आहे. या समाजातील कष्टकरी लाेकांची अवस्था बघताेय आपण. आज समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत आहेत. त्यांच्यापेक्षा कमी गुण असलेल्यांना प्रवेश मिळताे. नाेकरीत देखील असेच चित्र असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. ते म्हणाले यामुळे लाेकांमध्ये अंतर पडू लागले आहे. निवडणुका, सत्ता हे दर पाच वर्षांनी येतच राहतात. त्यावेळीस मात्र ही जी लाेक आहेत जे तुमचे लाेकप्रतिनिधी आहेत ही लाेक तुमच्या अधिकारासाठी तुम्हांला साथ देणार नसतील तर तुम्हीसुद्धा अशा लाेकांच्या पाठीशी राहिली पाहिजे जे तुमच्या न्याय हक्कासाठी उभे राहतील. आज सर्वाेच्च न्यायालयात वकील उपस्थित राहत नाहीत. कमाल आहे. हे जाणीवपुर्वक सुरु असल्याचे जाणवते अशी टिप्पणीही उदयनराजेंनी केली.

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार?

ते म्हणाले मला सगळ्या नेत्या मंडळींना सांगू वाटते लाेकांचा अंत पाहू नकाे. एकदा जर उद्रेक झाला तर थांबवणार काेण. काेण पुढे जाणार, मी ठरवले तरी तुम्हांला काय करु शकताे असं असं करु नका अशी चिंता उदयनराजेंनी व्यक्त केली. आज जी पिढी आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहे ती तुम्हांला विचारेल काय केले आमच्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा. नरेंद्र पाटील यांनी स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील युवकांना निश्चितच एक पाठबळ मिळणार आहे.

लक्षात ठेवा; मराठा समाज डाेक्यावर घेऊन नाचताे किंवा चपलेखालीही घेताे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Maratha Reservation Shivendrasinghraje Bhosale Satara Marathi News