esakal | चर्चाच चर्चा! उदयनराजेंची उद्धव ठाकरेंशी,शिवेंद्रसिंहराजे - अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

चर्चाच चर्चा! उदयनराजेंची उद्धव ठाकरेंशी,शिवेंद्रसिंहराजे - अजित पवार

मराठा आरक्षणाबाबत उदयनराजेंनी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

चर्चाच चर्चा! उदयनराजेंची उद्धव ठाकरेंशी,शिवेंद्रसिंहराजे - अजित पवार

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी आज (बुधवार) मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay यांची भेट घेतली. दाेन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली भेटीनंतर उदयनराजेंनी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाताील महत्वाच्या कार्यकर्त्यांची भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार यांना दिल्लीत भेटून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

आज (बुधवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खासदार उदयनराजेंनी मुंबईत भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याचे उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु या भेटीबाबतचा सविस्तर तपशील समजू शकला नाही.

दरम्यान उदयनराजेंचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (Shivendra Raje Bhosale) यांनी आजच उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) मुंबईत भेट घेतल्याची चर्चा आहे. ही भेट विकासकामांबाबत असल्याचा निर्वाळा काही कार्यकर्त्यांनी ई-सकाळशी बाेलताना दिला.

काेणत्या टोलनाक्यावर आणि काेणाला मिळत आहे 33 टक्के सवलत? तुम्हांलाही हवीय! वाचा सविस्तर

आता खासदार उदयनराजे भाेसलेंवर सर्व काही अवलंबून असल्याची चर्चा रंगली आहे 

काय बाई सांगू, कसं गं सांगू.. मलाच माझी वाटे लाज!

loading image