

- सिद्धार्थ लाटकर
सातारा: जीवनामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये युवकांना आपले करिअर निवडावयाची संधी आहे. महाराष्ट्रीयन युवकांना क्रिकेट क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी एक संधी किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने (कै.) दादामहाराज क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन अनेक दिग्गज खेळाडू देशाला मिळतील, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.