उदयनराजेंची देहबोलीने कार्यकर्त्यांत 'मेहेरबान' हाेण्याचे पसरले चैतन्य

गिरीश चव्हाण
Tuesday, 12 January 2021

साताऱ्याबरोबरच जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी पोवई नाका येथे तयार केलेल्या ग्रेडसेपरेटरचे उदयनराजे यांनी लोकार्पण केले.

सातारा : पालिकेची निवडणूक नजरेसमोर ठेवत सातारा विकास आघाडीने विकासकामांच्या माध्यमातून सातारकरांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. "गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी,' या स्लोगनचे लॉंचिंग ग्रेड सेपरेटरच्या लोकार्पणावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी करत निवडणुकीचे श्रीफळ वाढवले.
 
सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. नुकतीच सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने शाहूपुरी, विलासपूर, दरे खुर्द यांसह अनेक उपनगरे आणि त्रिशंकू भाग पालिकेत सहभागी झाला आहे. पालिकेत नव्याने आलेल्या भागात खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हा वर्ग येत्या काळात मतांच्या माध्यमातून "साविआ'च्या पाठीशी उभा करण्याची रणनीती उदयनराजेंनी आखल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा शहराबरोबरच विस्तारित भागातील विकासकामांकडे "साविआ'ने जास्तीने लक्ष दिले आहे. विस्तारित भागात आवश्‍यक सोयीसुविधा पुरवण्याबरोबरच त्याठिकाणच्या नागरिकांसाठी पालिकेने स्वतंत्र पथके तयार केली आहेत.

चर्चाच चर्चा! कऱ्हाड बस स्थानकावर अकरा तारखेचीच चर्चा 
 
गेल्या दोन महिन्यांत "साविआ'च्या माध्यमातून सातारा शहरासह विस्तारित भागात सुमारे 50 हून अधिक कामे प्रस्तावित केली आहेत. यापैकी काही कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली असून, त्यावर उदयनराजेंचे विशेष लक्ष आहे. सातारकरांचा "साविआ'ला असणारा प्रतिसाद उदयनराजे यांनी स्वत: नुकताच अनुभवला. साताऱ्याबरोबरच जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी पोवई नाका येथे तयार केलेल्या ग्रेडसेपरेटरचे उदयनराजे यांनी लोकार्पण केले. या सोहळ्यासाठी सातारा शहराबरोबरच विस्तारित भागातील शेकडो नागरिक आणि "साविआ'चे पदाधिकारी उपस्थित होते.

सातारकरांनाे! बिनधास्त खा अंडी, चिकन; कुक्कुटपालकांसह पशुसंवर्धन दक्ष

जमलेली गर्दी आणि घोषणांमुळे निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या रंगीत तालिमीची झलक अनेकांना याठिकाणी पाहावयास मिळाली. "साविआ'ने विकासाच्या मुद्‌द्‌यावर सातारकरांसह विस्तारित भागातील नागरिकांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. विकासकामे आणि "साविआ'च्या ब्रॅडिंगमधून सातारा पालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी उदयनराजेंनी सुरू केल्याचे त्यांच्या देहबोलीतून दिसून येत आहे. 

माण तालुक्‍यात पारंपरिक विरोधक एकत्र; आमदार गोरे गटाची प्रतिष्ठापणाला!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Satara Muncipal Council Election Satara Marathi News