
सातारा : राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज येथे भराव पुलाऐवजी भागनिहाय पारदर्शी पूल उभारावेत, तसेच खंडाळा- शिरवळ या दोन्ही ठिकाणी सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासह नवीन फ्लायओव्हर करावेत, तसेच येथे ड्रॉप ॲण्ड पिकअप पॉइंट करावा. नागठाणे येथे उड्डाणपुलाखालील प्रस्तावित अंडरपास मोठा करावा. ही सर्व कामे प्राधान्याने व्हावीत, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय परिवहन व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.