उदयसिंह उंडाळकरांच्या रुपाने कॉंग्रेसचे सिमोल्लंघन?

उदयसिंह उंडाळकरांच्या रुपाने कॉंग्रेसचे सिमोल्लंघन?
Updated on: 

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यातील दरी कमी झाली आहे. त्यामुळे मध्यंतरी आमदार चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. त्यामुळे टोकाच्या संघर्षाचा अंत झाला. त्यानंतर आता पुढचे पाऊल म्हणुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार चव्हाण आणि उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये अॅड. पाटील यांना कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रीय करण्यावर शिक्कोर्तब झाले. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.

कऱ्हाड दक्षिण मतदार संघाने आत्तापर्यंत तीनच विधासभेचे आमदार पाहिले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. पहिल्यांदा जेष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तब्बल सात टर्म म्हणजेच 35 वर्षे सलग माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे या मतदार संघाचे आमदार राहिले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुक लढवली. त्यामध्ये चव्हाण हे विजयी होवुन ते कऱ्हाड दक्षिणचे आमदार झाले. त्यामुळे कऱ्हाड दक्षिण मतदार संघाने आत्तापर्यंत तीनच आमदार पाहिले आहेत. राजकीय संघर्षातुन चव्हाण आणि उंडाळकर गटात नेहमीच मोठी चुरस पहायला मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांचे आई-वडील खासदार होते. त्यानंतर ते खासदार झाले. त्या काळातील राजकीय संघर्षातुन विलासराव पाटील-उंडाळकर हे बाजुला होवुन त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामाध्यमातुन त्यांनी कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचे आमदार म्हणुन नेतृत्व करत असतानाच त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबीनेट मंत्रीपदाची संधी मिळाली तर पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणुन काम पहत होते. त्यामुळे ते दिल्लीत आणि उंडाळकर राज्यात आपला बकुब राखुन होते. त्यामुळे दोन्ही गटातील संघर्ष कमी करण्यासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. त्याचा नाही म्हंटले तरी कॉंग्रेस पक्षाला फटका बसला.

बिहारला महागठबंधन विजयी होईल; काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

त्यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह अन्य निवडणुकांत कॉंग्रेस पक्षाकडुन उमेदवारी मिळवताना मोठ्या अडचणी यायच्या. त्यावेळी उंडाळकर गटाला अपक्ष उमेदवार उभे करुन निवडुन आणावे लागत होते. त्याचबरोबर मध्यंतरी अॅड. उदयसिंह पाटील यांच्यावर आलेल्या एका संकटावेळीही दोन्ही गटातील संबंध बरेच ताणले गेले होते. त्यानंतर पुलाखालुन बरे पाणी वाहिले. त्यानंतरच्या काळात बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व नेते उंडाळकरांच्या विरोधात एकत्र आले. त्यावेळीही दोन्ही गटातील संबंधित टोकाला गेले होते. त्यानंतर उंडाळकर गटाने भोसले गटाच्या मदतीने बाजार समितीतील सत्ता परत मिळवली तर भोसले गटाला कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत मदत केली. त्यानंतर मात्र टप्याटप्याने या दोन्ही गटातील दरी कमी होण्यास सुरुवात झाली. 

उंडाळकरांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि मनोहर शिंदे यांनी पुढाकार घेवुन दोन्ही गटातील दरीवर पडदा टाकण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा पहिला प्रयोग मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत करण्यात आला. तेथे पहिल्यादांच त्या निवडणुकीत ते दोन गट एकत्र आले. चव्हाण गटाचे मनोहर शिंदे यांना उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी साथ दिली. त्यामुळे शिंदे यांचा मलकापुर पालिकेतील विजय सुकर झाला. मलकापूरचा पॅटर्न काँग्रेसच्या उभारणीसाठी कऱ्हाड दक्षिणमध्ये राबवण्याची कार्यवाही तेव्हापासून सुरू झाली. दोन्ही गट एकत्र आल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे मलकापूर पालिकेच्या निवडणुकीतून दिसून आले. त्यामुळे चव्हाण गट तेव्हापासून उंडाळकर गटाची फारशी फारकत घेताना दिसून आलेला नाही.

तब्बल ४७ वर्षांनी उंडाळकर गटाकडुन पृथ्वीराज चव्हाण गटाचा सत्कार 

त्यानंतर मध्यंतरी आमदार चव्हाण व गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी पहिल्यांदाच उंडाळकर यांची घरी जाऊन भेट घेतल्याने या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. त्यानंतर नुकतीच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री थोरात, आमदार चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये अॅड. पाटील यांना कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रीय करण्यावर शिक्कोर्तब झाले. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.

सातबारा उताऱ्यांवर धचा मा! चुकांमुळे नागरिक त्रस्त

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण व माझी मुंबईत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये काही चर्चा झाल्या. मी कोणतीही डिमांड केलेली नाही, मात्र पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी तयार दर्शवली आहे असे अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी ई - सकाळशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
Marathi News Esakal
www.esakal.com