
कऱ्हाड : घुशी पकडण्याच्या पिंजऱ्यात अडकलं उदमांजर
- सचिन शिंदे
कऱ्हाड - घुशींसाठी लावलेल्या पिंजऱ्यात (Rate Cage) इंडियन स्मॉल सिव्हेट म्हणजेच उदमांजर (Udmanjar) अडकल्याने वन खात्याला (Forest Department) सापडले. वन विभागाने त्या मांजरास सुरक्षीत स्थळी सोडले आहे. वारूंजी येथे आज सकाळी सहाच्या सुमारास गुलाबराव पाटील यांच्या घरी घुशी साठी लावलेल्या पिंजऱ्यात इंडियन स्मॉल सिव्हेट म्हणजे उद मांजर अडकलेले होते. त्यांनी त्वरीत त्याची माहिती वन विभाग व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली.
घटनास्सथळी वनक्षेत्रपाल तुषार नवले व वनरक्षक रमेश जाधवर दाखल झाले , त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ते उद मांजर त्यांनी ताब्यात घेतले. त्या मांजराची पशुसंवर्धन दवाखान्यात डॉ.राहुल दडस यांच्याकडे तपासणी केली.सापडलेला सदर उद मांजर नर आहे. तो सुस्थितीत आहे. त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

वनक्षेत्रपाल नवले, मानद वन्यजीव रक्षक भाटे, वनरक्षक जाधवर, उत्तम पांढरे, योगेश बेडेकर भाऊसाहेब नलवडे यांच्या उपस्थितीत त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले.स्मॉल इंडियन सिव्हेट दक्षिण आशियातील सिव्हेटची प्रजाती आहे. त्याच्याकडे खरखरीत तपकिरी राखाडी ते फिकट पिवळसर तपकिरी फर आहे, ज्याच्या मागील बाजूस अनेक काळ्या किंवा तपकिरी पट्ट्या आहेत आहेत. सहसा, मागील बाजूस पट्ट्या असतात असतात. कानाच्या मागून खांद्यापर्यंत दोन गडद पट्टे असतात , त्याचा फर शरीराच्या वरच्या भागावर अनेकदा राखाडी आणि खालच्या बाजूस तपकिरी असतो. डोके राखाडी किंवा तपकिरी राखाडी असते.
Web Title: Udmanjar Stuck In Rat Cage
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..