Umbraj : उंब्रजला गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा; एक लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Satara News : माळीनगर परिसरातील एका खोलीत बेकायदा गुटख्याचा साठा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यावरून उंब्रज पोलिसांनी तेथे छापा मारून कारवाई केली.
Gutkha stock worth ₹1.36 lakh seized in police raid at Umbraj
Gutkha stock worth ₹1.36 lakh seized in police raid at UmbrajSakal
Updated on

उंब्रज : येथील माळीनगर परिसरात बंद खोलीत बेकायदा गुटख्याच्या साठ्यावर कऱ्हाड उपविभागीय कार्यालय व येथील पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दुचाकीसह गुटखा असा सुमारे एक लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी (ता. दोन) सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद झाला आहे. नीलेश दत्तात्रय बारदाने (वय ४२, रा. शिवनेरी कॉलनी, उंब्रज) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com