
-सचिन शिंदे
कऱ्हाड : तालुक्यातील १७ गावांसाठी तयार केलेली व अवघ्या चारच वर्षांत २०१० मध्ये बंद पडलेली उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तब्बल १४ वर्षांनी पुनरुज्जीवित होण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजनेच्या कार्यवाहीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. पाच गावांसाठी होणाऱ्या पुनरुज्जीवित योजनेला २४ जून २०२० ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्या योजनेची प्रत्यक्ष कार्यवाही आता प्राधिकरणातर्फे होत आहे. योजनेला सहा कोटी १५ लाख ९३ हजार इतका निधी मंजूर आहे.